पाण्या पावसाचे दिस
पाण्या पावसाचे दिस पाण्या पावसाचे दिसदिस…ढगाळ ढगाळमोठ्या अंतराने येतोऊन सावल्यांचा काळ पाण्या पावसाचे दिसमन वेल्हाळ वेल्हाळकुण्या दैवताच्या कंठीहिरव्या डोंगराची माळ पाण्या पावसाचे दिसरान सुगंधी सुगंधीभोळ्या शंकराचं औतहाके गोरापान नंदी पाण्या पावसाचे दिसदिस हिरवे हिरवेभिजलेल्या पाखरांचाथवा आभाळ मिरवे गो. शि. म्हसकर