पाखरांसाठी पाणी

इवलेसे कोवळे अंग
रानोमाळ ती फिरती
धडपड करुनी जीवाची
पिल्लांना घास भरवती

परवा न करता कुणाची
चटके उन्हाचे करीत सहन
पंख पसरूनी झेप घेती
पिल्लांना बघूनच रमवती मन

चोचीत चारा,उन्हाचा मारा
विसावा नाही त्यांना क्षणभर
भटकंतीने जीवाचे हाल
हवा त्यांस पाणी थेंबभर

कोवळे अंग राब-राब राबती
थोडी दया करावी त्यांच्यावर
अंगणात दाणे शिंपडूनी
पाणीही ठेवावे छतावर

जसं त्यांना जीव आहे
तसचं आपलं समजुनी करावी मदत
जणू आपल्या लेकरांसारखेच
जीवनावश्यक पाणी आहे त्यांनाही अवगत

सोनाली कोसे

9 thoughts on “पाखरांसाठी पाणी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *