अश्रु

आठवणीत कुणाच्यातरी
ओघडतात हे अश्रू…..!!!
जाणीव एकटेपणाची
करून देतात हे अश्रू…..!!!
व्यथा आपल्या जीवनाची
सांगतात हे अश्रू…..!!!
हार न मानता कधी सामोरे जाण्यास
सांगतात हे अश्रू…..!!!
विरहात जगणे अशक्य , जाणीव
करून देतात हे अश्रू…..!!!
स्वर्गवासी पित्रुला आठवताना
ढासळतात हे अश्रू…..!!!
प्रियकराच्या दुराव्याने नयनी
दाटतात हे अश्रू…..!!!
कितीही लपवावेसे वाटले तरी
लपेनासे होतात हे अश्रू…..!!!
लपेनासे होतात हे अश्रू…..!!!

सोनाली कोसे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *