हरकत नाही
काट्यावरी येतो काटा, वेळ ही सरकत नाही ..
कित्येकदा नशीब छळते, तरी माझी हरकत नाही..
उन्मळून पडते इथे, नाते प्रियजनाचे,
ऑनलाईन राहिल्या विना, कुणालाही करमत नाही..
ती पहाटे कातर डोळ्यांनी, दुसऱ्याच्या गाडीतुनी,
अन् समजावते मनाला, आता मला ओळखत नाही..
लोकशाहीच आता म्हणे, गुदमरून मेली,
संसदेचे शहाणपण, पुढाऱ्यात झिरपत नाही..
केवढी ही गर्दी इथे, पांडुरंगा दर्शना तुझ्या,
पायरीच्या चोख्या कडे, बघायास फुरसत नाही..
काजळाच्या धुंद रेषा, पापण्यांवर मिरवती,
तुला पाहतो, पाहत राहतो अन् माझे मला उरकत नाही..
आभाळ येतं, पाऊस येतो, बरसतात सरीवर सरी,
पहिल्या सारख्या विजा आता, श्रावणात थिरकत नाही..
यात्रा, बाजार,गाव, शहर फिरलो, तू सोबत असताना,
एकट्याला एकटी ही, वाट आता फिरवत नाही..
सुरज खंडारे
Hi kavita vachun vastavikateche darshan zale. Sir….. Atishay sundar
Khup Chan Sir Kavita tumchi