नाते तुझे माझे
नाते तुझे माझे
मैत्रीच्या पलीकडले
कोणी ना समजले
मैत्री पेक्षा जास्त ते जपले
नाते तुझे माझे
कधी ना तुटायचे
जग जरी आले आडवे
त्याला ही सामोरे जायचे
नाते तुझे माझे
असे काही जपले
लेकराला जशी
आई सांभाळे
नाते तुझे माझे
गोड गुलाबी गलातले
निरागस अन् निष्पाप हसू
बालपण जणू फुलातले
नाते तुझे माझे
जगाच्या पलीकडचे
शब्दात न सांगता येणारे
असे नात्यांच्या पलीकडचे
नाते तुझे माझे
जीवाला जीव देणारे
एकमेकांचे खोडी काढणारे
पण तितकेच विश्वास ठेवणारे
तुझे माझे नाते
सुख दुःखाने विणलेली असते
कधी गोड तर कधी कडू
पण आठवणींची शिदोरी असते
तुझे माझे नाते
चंदना सारखे असावे
स्वतः झिजून ते
दुसऱ्यास मधुगंध द्यावे
घर परिवार मोठे असावे
आनंदाला पारावार नसावे
नाते तुझे नि माझे
रंगात रंगून निघावे
असे तुझे माझे नाते असावे
जन्मोजन्मी ते टिकावे
अंतर त्यात कधी न यावे
प्रेमाने ते फुलत जावे
असे आपले नाते असावे
मेघा शहा
Great ❤️👌