यश मिळो तुजला

विमानाच्या पंखासारखा  

नभात घे भरारी

यश तुला मिळोनी

नजर ठेव वाटेवरी

पाय घट्ट रोवून

चढ तू शिखरावरी

तोल न जाऊ देता

चाल आपल्या वाटेवरी

भिऊ नकोस कधी

आहेत हात मोठ्यांचे पाठीवरी

यशाचा सुगंध पसरव

सगळ्या जगावरी

वाजू दे डंका तुझा

या सगळ्या देशावरी

यश हे तुजला मिळो

                           मेघा शाह

9 thoughts on “यश मिळो तुजला”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *