मैत्रीच्या पलीकडे

हृदयात माझ्या वाकून बघ एकदा

दुसरे कोणी नाही सख्या

तुझ्या शिवाय मी दुसऱ्यावर

जीव लावीन रे कसा

संदेह तरी तू माझ्यावर

घेतलास तरी कसा

तुझ्या विना जीवनात माझ्या

दुसरा कोणी ही नाही रे असा

वाट बघते तुझी येण्याची

माझ्या अश्रूंनी रस्ता सुकला जसा

नाते आपले मैत्रीच्या पलीकडचे

आता तरी परतुनी घरा येशील का

आयुष्यभर साथ देशील का सख्या

मेघा शहा

167 thoughts on “मैत्रीच्या पलीकडे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *