मैत्रीण अशी असते

ना गोरी ना कळी आहे
मनाने ती सुंदर दिसाते
दूर जरी ती राहते
सदा सर्वकाळ हृदयात वसते

चुकले जरी मी वाट
अचूक वाट ति दाखवते
जरी संसारात रमलो तरी
सदा आठवण काढत असते

अंधारात हरवले तरी
उजेडात मात्र ति आणते
अपयशातून ही मला
यशाची वाट मात्र ति दाखवते

थकलेल्या चेहऱ्याला
तेज नवे ति देते
दुनियेच्या या गर्दीतही
हात माझा कधी ना सोडते

यशाचे शिखर गाठताना
पाठीवर हात ठवते
“तू लढ मी आहे” असे
उच्चार मात्र कायम काढते

सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर
सहचारिणी ती बनून राहते
तुझ्या सारखी मैत्रीण
सर्वांना मिळावी अशी
मी प्रार्थना करते

अशा माझ्या या मैत्रिणीला
उदंड आयुष्य मिळावे
अशी ईश्वर चरणी
सदिच्छा व्यक्त करते

अशा या मैत्रिणीला
मानाचा मुजरा करताना
मान मात्र मी ताठ ठेवते
अश्या या मैत्रिणी समोर
मी मात्र नतमस्तक होते

मेघा शहा