ओरबाडले गाणे
आता काही उरेलच
अशी आशा राहिली नाही..
टिमटिमणाऱ्या काजव्यांना
अंधाराची किंमत कळली नाही..
उधाण दिवस होते
बहरायच्या रात्री..
पावसाचा काळ होता
डोक्यावर् प्रेमाची छत्री..
एक दिवस पावसासोबत
खिडकीत चहा पित असताना..
छातीशी पुस्तके कवटाळत
दिसली धावत जाताना..
तशीच एक् वीज
काळजात धडकली..
अशीच का जाणार ती
हृदयाच्या कँमेऱ्यात अडकली..
आता सुरू झाला माझा
हृदयासी सामना..
असावी ती आयुष्यात
मनी हीच कामना..
असच उनाड हसणं तिचं
खट्याळ होते डोळे..
होती एक फुलपाखरू
मन साधे भोळे..
दहावीची परिक्षा देऊन
टाकलं कॉलेजात पाऊल पहिले..
स्वप्नाचे बांधले किल्ले
अन् बालपण मागे राहिले..
हळू हळू कॉलेजचे
सुरू झाले लेक्चर..
सगळ्यांना दिसू लागले
आपले आपले फ्लूचर..
काही दिवसांनि कॉलेजच्या
सुरू झाल्या क्रीडा स्पर्धा..
अभ्यास अन् खेळा मधे
वेळ झाला अर्धा अर्धा..
असाच एक दिवस कॉलेज मधे
खूप वेळ गेला..
भेटत नव्हते काही
यायला खूप उशीर झाला..
दुर् कुठून तरी तिला
मोटर सायकल लाइट दिसला..
तिच्या जवळ येऊन तो
गोड गालात हसला..
पर्याय नव्हता काही म्हणून
ती गाडीवर बसली..
मनात होती भीती तरी
खोट खोट हसली..
हाय! मी अभय
तो घर आल्यावर म्हणाला..
वेणी झटकत मागे तीने
नाकाने टोमणा हाणला..
ती कॉलेजला जाताना
तो रस्त्यावर असायचा..
चौका चौकात मित्रा सोबत
सतत् तिला दिसायचा..
नाव सांग ना तुझं! म्हणत
एकदा हिम्मत केली..
“अनुप्रिया ” म्हणत तीही
लाजत लाजत गेली..
तिच्या मैत्रिणी कडून मोठ्या कष्टाने
त्याने नंबर तिचा मिळवला..
“अनु ” आनंदाने तो
पुरता हरवला..
गुलाबी थंडीत
बोलत होते छतावर..
चेहऱ्यावर वेगळाच नुर्
अन् नाव होते हातावर्..
हाय-बाय करता करता
गप्पा रंगायच्या तासन तास..
उद्या असेल पुन्हा चौकात
त्याला पहायची तिची आस..
एका अवकाळी पावसाने
घरातली लाइन गेली..
फोन लागत नाही म्हणून
ती हरणी बेचैन झाली..
दुसऱ्या दिवशी घाई घाईत
चौकामधे गेली..
त्याला पाहून आसवासवे
रडत रडत बिलगली..
तुझ्या शिवाय राहू शकत नाही
स्वप्न दूसरे पाहू शकत नाही..
हुंदके देत सांगत होती
मन तुझ्यात गुंतले रे!!! दुसऱ्याला देऊ शकत नाही..
तो तिच्या खांद्यावर् ठेवत
तिच्या नजरेत बघू लागला..
लोक पाहतील, जा ना घरी,!! म्हणत
गालावर हात फिरऊ लागला..
निरोप त्याला देताना
गळा पुन्हा भरून आला..
चिंब झालेल्या पापण्यांनी
शहारता निरोप दिला..
कॉलेजच्या मैत्रिणी नेहमी
त्याच्या नावाने चिडवायच्या..
चिडवणाऱ्या मैत्रिणी
तिला खूप आवडायच्या..
कुठेही गेली तरी
सेल्फी मात्र काढायची..
प्रत्येक् न प्रत्येक फोटो
त्याला आवडीने पाठवायची..
दिवस रंगत होते
प्रेम बहरत होतं..
नाव जरी आलं सामोर
अंग अंग शहारत होतं..
वेळ मिळाला तसा
नेहमी बाहेर फिरायचे..
आवडेल ते पदार्थ
एका ताटात खायचे..
त्याच्या साठी आवडीने
सुंदर साडीत सजायची..
गोड पापण्या मिटत
मधुन मधुन लाजायची..
दर् वर्षीच्या यात्रेत
पाखरं होऊन फिरायचे..
हातात हात धरून
धुंद गर्दीत हरवायचे..
सांगत होती गहिवरल्या
डोळ्यात आणून पाणी..
ओल्या झाल्या कडा माझ्याही
ऐकून तिची कहाणी..
नको सोडून जाऊ रे!!!
म्हणत तिने भिक सुद्धा मागितली..
गेला…. सोडून तो
साधी नजर नाही बघितली..
माझ्या पेक्ष्या चांगला मिळेल
नेहमीचेच जुने वाक्य म्हणत होता..
बरं वाटाव मनाला म्हणून
खोट खोट रडत होता..
माहित नाही, कुठे असेल् कसा असेल्
का सोडले त्याने
हसत्या खेळत्या आयुष्याचे
ओरबाडून गेला गाणे..
त्याच्या आठवणीत दिवस रात्र
ती आताही रडते..
ओठावर् खोटं हसू ठेवत
त्याची आठवण काढते..
प्रेमाला बदनाम करणारं
कृत्य असं करायचं का??
सोडून गेला तो म्हणून
तिने सतत् रडायचं का ?
सूरज खंडारे
Hi kavita वाचतांना dolyamadhale ashru rokhu nahi shakle sir.. evadhi apratim rachana aahe.