आयुष्याचे कोडे

आयुष्याचे कोडे कधी
कोणास सुटले नाही
खेळखेळतो कोण अजब
हे कधीच कळले नाही

घेऊ कोणा जवळचे मी सर्व
देऊन जाई मी कोणाला
चोरांनाही देव पावतो
पण त्यांना कधीच पचले नाही

समय कठीण कोणासाठी
तर सोपे जाई कोणास
चिखलातले कमल कधी
बागेत फुलतच नाही

गरीबा घरी सुखात नांदे
श्रीमंती खाई कोणाला
चिंतेला हरेल असे
असले वैभव कुठले नाही

सुखासुखी ही मरण पावते
जर्जर खोटे वरती
कुणास मिळते हवे नको ते
कुणास मिळे न काही
आयुष्याचे कोडे कधी
कोणास सुटलेच नाही

मेघा शहा

9 thoughts on “आयुष्याचे कोडे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *