सरते शेवती

बेरीज वजाबाकीचं गणित
मला कधी जमलंच नाही
सरतेशेवटी किती उरणार
याचा अंदाज बांधलाच नाही

उत्तरं नसतील असे प्रश्न
कधी लिहिलेले आठवत नाही
अंतरंगातील संवेदनशील शब्दांना
कधी जखमी केलेलं ऐकिवात नाही

मस्तकावरील त्या रेषेचा अर्थ
डोळ्यांनी कधी वाचला नाही
आणि तो अर्थ सहज कळेल
एवढं हे आयुष्य व्यर्थ नाही

                       – पांडुरंग रघुनाथ कोकरे

38 thoughts on “सरते शेवती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *