बापाविना मोल नाही [Bapavina Mol Nahi]

बापाविना मोल नाही

बापावीना आम्हा मोल नाही

बापाविणा सौभाग्य आईला नाही

बाप नाही तर विश्वात कोणी नाही

बापविना पोरं झाली पोरके

माहेर ही लेकीला झाले परके

बापाचा आधार आता उरला नाही

उघडे पडले घरदार अनेक काही

बापासारखा आधार कोणाचा नाही

बापाला पायदळी तुडवू नका कोणी

बापसारखा पिता सारे विश्वात नाही

जो ठेवेल किंमत बापाची

जग किंमत ठेवेल त्याची

बापाला कधी दुखवू नका

बापाला कधीही अंतर देवू नका

वृध्छाआश्रम कधी दाखवू नका

बापाची मान खाली जाईल

असे तुम्ही कधी वागू नका

बापाची मान कधी झुकवू

देवू नका.

                                  मेघा शहा

11 thoughts on “बापाविना मोल नाही”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *