सागर किनारा

पायवाट तुडवता तुडवता
आला तो सागर किनारा
जिथे भेटलो आपण थेट
नी दोघांतील संवादाचा पसारा

ओथंबलेल्या सागरात
प्रतिमा तुझी दिसे
तुझ्या-माझ्यातील प्रीत
चक्क नेत्रासमोर भासे

सळसळत्या त्या लाटा
भिडे येऊन किनाऱ्याला
नजरेला नजर भिडवून
अलगद मिठी मारायचीस मला

हातात हात घालूनी घट्ट
वचन दिलीस जन्मोजन्मीची
कधीही साथ सोडणार नाही
स्वप्ने ती सुखी संसाराची

आठवते ग आजही मला
भेट आपुली ती पहिली
सागर किनाऱ्यालगतच
प्रीत आपुली बहरली

                    

                        सोनाली कोसे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *