हरवत चाललेल्या भावना

हेमंत हसतो, हरवतो, कमालीच्या आनंदाला स्पर्श करतो तेव्हा त्याच्या आयुष्याला स्थिर,

पण चैतन्याच्या गतिरोधकामुळे लोकांच्या भावविश्वात प्रचंड वेगाने उड्या मारीत असतो…

पण एके दिवशी अचानक डोळ्यांनसमोर अंधार दाटतो, कंठ आवळतो,

हृदयाला कुणी गोष्टींमधली क्रुर राणी फाशीचा फर्मान काढते दुसर्‍या क्षणाला मेंदुचा गोळा होतो,

डोळ्यांचे काचा होतात…

ग्लानि येऊन हेमंत नावाचं अस्तित्व धाडकन जमिनीवर आदळुन ते तुमच्यात शिरतं

डोळ्याच्या काचा जमिनीवर सांडतात.

अचेतनेच्या जगात चेतनेचं  अस्तित्व खडसावणार्‍या “काचे” समोर तुम्ही उभे राहता,

स्मितहास्य काचेसाठी फुलवतं.

आता तुम्ही काचेसाठी काम करता

रोज सकाळी तूम्ही उठता आहात काचेत दिसणार्‍या जगासाठी.

  जगाला काय वाटेल, माझं Economical Status वाढायला हवं म्हणून तुम्ही राबता आहात,

“जेवढे पैसे तेवढं प्रेम ” हा राणी ने दिलेला मंत्र जपता आहात ….

आता काचांनमधे अंगावर भिकारलेल्या मायेच्या धाग्याने विणलेले सुरकुत्यांचं जाळ दिसतयं…

राणीच्या हैवानानं टाकलेलं ते जाळं संपवेल तुम्हाला कायमचं …

हृदयाला फाशी लागुन बाहेर आलेलं प्रेम अजुनही राणी ने स्वतःजवळ कापुन एका संदुकमध्ये पाळत ठेवलय… हा हा हा

                                                                                               

                                                                                                                                                      हेमंत कोतवाल 

47 thoughts on “हरवत चाललेल्या भावना”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *