220 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas मैत्रीच्या पलीकडे हृदयात माझ्या वाकून बघ एकदा दुसरे कोणी नाही सख्या तुझ्या शिवाय मी दुसऱ्यावर जीव लावीन रे कसा संदेह तरी तू माझ्यावर घेतलास तरी कसा तुझ्या विना जीवनात माझ्या दुसरा कोणी ही नाही रे असा वाट बघते तुझी येण्याची माझ्या अश्रूंनी रस्ता सुकला जसा नाते आपले मैत्रीच्या पलीकडचे आता तरी परतुनी घरा येशील का आयुष्यभर साथ देशील का सख्या मेघा शहा