April 25, 2022

यश मिळो तुजला

यश मिळो तुजला विमानाच्या पंखासारखा   नभात घे भरारी यश तुला मिळोनी नजर ठेव वाटेवरी पाय घट्ट रोवून चढ तू शिखरावरी तोल न जाऊ देता चाल आपल्या वाटेवरी भिऊ नकोस कधी आहेत हात मोठ्यांचे पाठीवरी यशाचा सुगंध पसरव सगळ्या जगावरी वाजू दे डंका तुझा या सगळ्या देशावरी यश हे तुजला मिळो                            मेघा शाह

यश मिळो तुजला Read More »

मैत्रीच्या पलीकडे

मैत्रीच्या पलीकडे हृदयात माझ्या वाकून बघ एकदा दुसरे कोणी नाही सख्या तुझ्या शिवाय मी दुसऱ्यावर जीव लावीन रे कसा संदेह तरी तू माझ्यावर घेतलास तरी कसा तुझ्या विना जीवनात माझ्या दुसरा कोणी ही नाही रे असा वाट बघते तुझी येण्याची माझ्या अश्रूंनी रस्ता सुकला जसा नाते आपले मैत्रीच्या पलीकडचे आता तरी परतुनी घरा येशील का

मैत्रीच्या पलीकडे Read More »

असं एक नात असावं

असं एक नात असावं आयुष्यात एक नात असावं दिसण्यावर नाही तर मनावर प्रेम करणार जगाला दाखवण्यासाठी नाही तर दोघात जग निर्माण करणार भांडणं झाल तरी साथ नाही सोडणार मनापासून काळजी करणार एक उदास असताना दुसऱ्याने न सांगताच ओळखणार डोळ्यात न दिसणार पाणी मनातल्या मनात अलगद टिपणार अस आयुष्यात एक नात असावं                                               मेघा शाह

असं एक नात असावं Read More »

error: