लावणी
असं लाजुनी मजला, पाहू नका..
वटारं डोळं तुमचं दावू नका…
मी हाय गुलाबी छडी
घाला की हाताची घडी
वाट पहा ना थोडी
अन् राया तुम्ही, लावू नका ना कडी…
तुमच्या डोळ्याचा इशारा मजला देऊ नका..
वटारं डोळं तुमचं, दावू नका…
मैना मी लयी, साधी भोळी
घाई घाईत तुमच्या
अहो राया, घाई घाईत तुमच्या
दारात फसली चोळी..
असं येड्या वाणी तुमी होऊ नका..
वटारं डोळं तुमचं, दावू नका..
मधा वाणी व्हट माझं
हिरी वाणी डोळं..
मकरंदी वेळीच हे
गाभुळलं फळ..
राया… गाडीवर तुमच्या मला, नेऊ नका…
वटारं डोळं तुमचं, दावू नका…
सुरज खंडारे