जीवन एक जगणे नुसते

सरूनगेल्या वर्षाच्या उरतील नुसत्या आठवणी
हदरूनच गेले जगणे, अस्तित्वालाच दिले हादरे
एका सूक्ष्म जिवा ने ढवळले अवघे विश्वच कि रे
अहंकाराला मातीत मिसळला,
श्वासासाठी धडपड सगळी
कुठला पैसा कुठली नाती
पराधीन आहे जगती हेच सिद्धझाले परतुनी
निसर्गाच्या कोपण्याने हादरलीच धरती,मानवतेचा कसं लागला,माणुसकी आत्ताच समजली
आनंद म्हणजे हव्यास नाही,आहे फक्त एका श्वासाची धडपड
कोणाला जीवदान मिळाले,कुणी मुकले प्राणास
मी मी हा फक्त एक अर्थहीन शब्द आहे,कळले ह्याचं काळांत
अनुभवातुन आता एकंच शिकणे,जीवन एकंच ते आनंदाने जगणे,
नको दुजाभाव,नको तो हव्यास,प्रेम देणे हाच असावा एहसास
आता समजले मानवाला जीवन एक फक्त श्वासाचा खेळ
पैसा, अडका,मान,मरातब,सगळा नुसता आभास आहे
यमाने नुसतं चल म्हंटले कि सगळे सोडून निघायचे आहे
तरीही प्रेम, आसक्ती,मोह ,माया ,लालसा माणसाची काही सुटतं नाही
बंधनातून त्याला कधीच मुक्ती मिळतं नाही
बंधनातून त्याला कधीच मुक्ती मिळतं नाही

                                         – अर्चना कुलकर्णी



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: