Sumi

सुमी...

सकाळी सकाळी सुमी अंथरुण आवरत होती. दिवस भर जमिनीत खपलेला तिचा बाप दारावर पडलेल्या उन्हात मस्त निजलेला.. सुमीची माय दळायला गेलेली.. 

    .. आज का म्हणून सुमिला करमत नव्हत.. घर सारवायला माती आणायची म्हणून सुमी, गढी वर गेली.. माती उकरता उकरता सहज तिची नजर पिवळ्या कपड्या वर गेली.. पाहते तर गावातील शेवंती मरून पडलेली.. तिच्या अंगाचं पाणी पाणी झालं… ती धावतच घरी आली.. तोपर्यंत तिचा बाप झोपेतून उठून बसला होता. तिने बापाला सर्व हकीकत सांगितली.. चार सहा माणसे घेऊन तो गढी वर गेला.. तिथे शेवंती च्या अंगावर चाकुचे वार केलेले होते.. काळजाचा थरकाप उडवणारी घटना.. 

  सुमी शेवंती ला आत्या म्हणायची.. लय जिव होता शेवंती चा सुमी वर.. शेवंती ला कोणी नातेवाईक नव्हते.. साधरणपणे चाळीशी ची महिला.. गावात जादू टोणा करते म्हणून तिला लोक चांगले पाहत नव्हते.. लग्ना नन्तर नवऱ्याने एकाच वर्षात सोडलं.. तिने आई वडीलाची शेवट पर्यंत सेवा केली.. त्यात सुमीच्या बापाला लोकानी सांगितले कि पोरीला सांभाळ.. नाही तर गमावून बसशील.. तिच्या बापाला फक्त कष्ट माहित.. सुमी अल्लड पोर.. विशीतली सुमी दोन चार पुस्तके वाचून हुशार झाली.. जादू टोणा.. करणी.. ह्या गोष्टी तिच्या खिजगणित नव्हत्या.. 

   शेवंती गेल्या सुमी उदास राहायची नेहमी सारखं एक् दिवस सुमी माती आणायला गेली तेव्हा तिला

 तिला दुर् मातीत काही चमकताना दिसलं.. रक्ताने माखलेला सुरा होता.. मातीचे घमेले तिथेच ठेवून तिने पोलिस स्टेशन गाठले.. सुरा पोलिसांच्या ताब्या ताब्यात दिला.. 

   आता तपासाला गती आली.. पोलिसांनी तपासाची चक्रे फ़िरवली.. २४ तासात गुन्ह्या चा केद्र बिंदू शोधला.. गावातील सरपंचाचा मुलगा अपराधी आहे कळल्या वर त्याला पोलिसांनी जेल मधे घेऊन गेले.. गावाची एकी झाली.. पंचायत बसली एकमताने ठरले… त्याच्या विरोधात कोणी साक्ष नाही द्यायची.. त्याने जे केले ते योग्य केले.. शेवंती जादू टोणा करारायची.. 

     गावातील उलट्या काळजाची मंडळी सुमीच्या ध्यानात आली… अन् सुमी साक्ष द्यायला पुढे आली..

 जसे सरपंचाला कळले गनप्याची सुमी साक्ष देईल.. त्याच्या पाया खालची वाळू सरकली… त्याने पैसे देऊन चुप राहण्या चा निरोप पाठवला.. सुमी सरपंचाला जुमानली नाही… सरपंचा ने जिवे मारण्यची धमकी दिली तरी सुमी मागे हटली नाही… इकडे तिच्या माय बापाच्या काळजात भीतीचे काहूर उठले.. पन् सुमी काही मागे हटेना.. सरपंचने गावातून बाहेर काढून टाकण्यात येईल असा निरोप पाठवला.. सुमी काही केल्या ऐकत नव्हती.. 

     तोपर्यंत सुमी सरपंचा च्या पोराची जिरवणार हे साऱ्या गावात माहित झाल.. म्हणून सारा गाव विरोधात उभा होता… गावा विरोधात जाणे एका विस वर्ष वय असलेल्या पोरी साठी नक्कीच सोपी गोष्ट नव्हती.. तिने हिम्मत केली.. अंधश्रद्धा या रोगाला तडीपार करण्या ची… कारण ही लढाई सरपंच अन् सुमीत नव्हती तर् ही लढाई होती वर्षानुवर्षे चालत आलेल्या.. आपल्या रक्तात मिसळलेल्या भीती विरुद्ध, ही लढाई होती कित्येक शेवंता ला जादू टोन्याच्या नावाखाली जिव गमवाव्या लागले अश्या क्रूर हिंसे विरोधात.. 

      ..दोन  दिवसा पासून सुमी दिसत नाही म्हणून सुमीचे माय बाप पोलिसाकडे गेले.. इकडे गावात बोंब झाली सुमीने सरपंचा कडून पैसे खाल्ले.. अन् पळून गेली… खूप शोध झाला… तिसऱ्या दिवशी सुमीचा पत्ता लागला.. तिला सरपंचा च्या लोकानी बलात्कार करून मारून टाकले.. तिचा उघडा देह.. कुणाही सामान्य व्यक्ती ला चीड आणून देणारा… सुमीच्या जाण्या ने तिच्या आई वडिलांचा एकुलता एक आधार गेला.. गाव मेणबत्या घेऊन… Justice for sumi करत निघाला रस्त्यावर्…

           कथा जरी कल्पनिक असली तरी तिला वास्तवाची झालर आहे… प्रत्येक वेळी जादू टोणा करणी च्या नावा खाली शेवंती… शेवंती साठी लढणारी सुमी अन् अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या साठी डॉ. दाभोळकर यांना मरने अगत्याचे आहे का..?

तूर्तास एवढचं… 

 

         सुरज खंडारे