एक कप चहा
दोन जणांची नकळत भेट होणे हे कदाचित नशिबाच्या पुस्तकात लिहिलेलं असावं. मी राहुल मनातल्या भावना जरी पुस्तकात मांडतो. तरी याचा अर्थ सर्वच माझ्या मनासारखं होतय असे नाही ना …… मुंबई हे नाव जरी तरी प्रत्येक कलावंत, लेखक, राजकीय घडामोडी यांच्या उलाढालीच प्रमुख केंद्र आहे. तसेच एकदा मुंबईच्या अथांग समुद्रापाशी जाऊन बसलो. आणि त्याच वेळेस माझ्यातला लेखक कागदावर बोलू लागला…
प्रेम प्रत्येकजन आपल्या जिवापाड व्यक्तीवर प्रेम करत असतो. मी समुद्रकाठावर मरीनड्राइव्ह जवळ बसलो होतो त्याठिकाणी एक पत्र ठेवलेले होते. मी पहिलं तेव्हा वाटल की कोणाचं राहिलेलं असावं, पण थोड्याच वेळात लक्षात आले की ते राहिलेलं नव्हते ते कुणीतरी मुद्दाम ठेवलेले होते. ते पत्र मी जेव्हा उघडले तेव्हा त्या पत्रात दोनच शब्द होते “काळजी घे, तुझाच स्वप्नील” अस, आणि तेवढ्यात त्या ठिकाणी एक मुलगी आली. दादा या वेळेसच पत्र तुम्ही वाचलं का ? कसे वाटले, काय लिहिले होते, असे वेगवेगळे प्रश्न ती मुलगी विचारू लागली, मी पटकन बोललो, जास्त काही नाही, काळजी घे असंच लिहिलेले होते. तेवढ्यात त्या मुलीच्या ओठातून शब्द नव्हे तर डोळ्यातून अश्रु निघत होते. तेवढ्यात ती मुलगी म्हंटली दादा याच दिवसाची मी आतुरतेने वाट बघते. हा दिवस वर्षातून एकदाच येतो. आम्ही दोघेजण एकमेकांच्या खूप प्रेमात होतो. प्रेमात मला तो कायम म्हणायचा, की आमची मांजर किती गोड दिसते. याच समुद्राच्या साक्षीने साताजन्माच्या गाठी बांधल्या होत्या पण नियतीने खेळ जरा वेगळाच केला. आम्ही दरवर्षी पहिल्या पावसात एक कप चहा सोबत घ्यायचो. पण त्या वेळेसचा चहा त्यालाही मिळाला नाही आणि मलाही मिळाला नाही. मागच्या चार वर्षापूर्वी याच दिवशी आम्ही दोघेजण असच एकांतात भेटलो होतो. पिंटूच्या टपरीवरून चहा मागवला. आणि नियतीने वेगळाच खेळ रचला. स्वप्नीलने माझ्या हातात चहाचा कप दिला आणि तेवढ्यात त्याच टपरीवर अतिरेकी हल्ला झाला. आणि त्याच वेळेत नशिबाने आमचा डाव मोडला. खर तर जे आपल्याला मान्य असते ते देवाला नाही आणि जे देवाला मान्य असते ते आपल्याला नाही. तो कायम मला म्हणायचा तुझ्यासोबत एक कप चहाचा मारला ना, की मला या समुद्रासारख अथांग प्रेम तुझ्यावर करायला आवडत. मला त्याने वचन देखील केल होत या दिवसाला कधी विसरायचं नाही हं ….. तू कुठेही गेली , कितीही लांब असली तरी एक कप चहाचा प्यायला यायचं. आणि आजच्या तारखेला आम्ही दोघेजण पहिल्यांदा भेटलो होतो, त्याच दिवसाची आठवण म्हणून मी दर वर्षी हा दिवस साजरा करते. मला माहिती नाही की हे पत्र कोण लिहीत, कुठून येत, पण त्याची फॅमिली देखील माझ्यावर खूप प्रेम करते. एक कप चहा आमच्या नात्यातला सुखाचा होण्यास पुरेसा ठरेल. चहा पिताना तो कविता खूप छान म्हणायचा , आमची मांजर किती गोड दिसते …….
आमची मांजर किती गोड दिसते,
राहुलला पाहून खुदकन हसते,
हसून हसून पोट मात्र दुखते
त्यांना पाहून दुसऱ्यांच्या डोळ्यात खुपते,
म्हणून तुम्हाला सांगतो आमची मांजर किती गोड दिसते…..
जवळ असताना यांना कमी पडतो नुसता वेळ
पण लांब गेल्यावर दोघी ठरवतात नुसती भेटण्याची वेळ
तरी आमचं प्रेम हे भारीच असणार ,म्हणून सांगतो आमची मांजर किती गोड दिसते
सकाळ जरी झाली तरी आम्ही दोघे झोपाळूच असणार
पण लोकांच्या मनात कायम आमची जोडी लाजाळूच असणार
म्हणून सांगतो आमची मांजर किती गोड दिसते
आता मांजर जरी गोड असली तरी त्या गोडव्याला स्वप्नीलशिवाय अर्थ नाही , म्हणून सांगतो आमची मांजर किती गोड दिसते ……
– प्रसाद भालचंद्र सोनवणे