ती एकटी असताना

         हॅलो , कसे आहात , आज सकाळपासून नुसती गडबड चालु आहे. मी जात होतो माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला पण अचानक एक रात्रीचा एक प्रसंग आठवला. म्हणून आधी तुम्हाला शेयर करतो मग तिकडे जातो .

                       हर्षल दिसायला साधाभोळा पण तरुण वयात प्रेमाची चाहूल प्रत्येकाला असतेच तशीच हर्षलला देखील होती. खर तर अस म्हणतात की प्रेम शोधाव लागत नाही.  नशिबात असेल तर आपोआप मिळते. पण आजची तरुण पिढी त्याच प्रेमाला शोधते व बळजबरीने मिळवते. पण महत्वाच सर्वेच मूल तसे नसतात. काही मूल प्रेमाला फुला सारखं जपतात तर काही मूल त्या फुलाचा वास येत नसला तरी बळजबरीने घेण्याचा प्रयत्न करतात. पण हर्षल तसा देखील नव्हता. हर्षलने निस्वार्थपने प्रेम केले. खर तर मैत्री आणि प्रेम या दोघी गोष्टी पाहिल्या तर मैत्रित एक अंतर असते. पण प्रेमात त्या अंतरला झाकून अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. हर्षल आणि मीनाक्षी या दोघांच्या प्रेमाच्या नात्याला सुरवात होऊन जवळ जवळ एक ते दोन वर्ष झाले होते. असे म्हणतात की प्रेमाच्या आयुष्याच्या पुस्तकात जसे जससे पानांचा उलगडा होतो तसे तसे प्रेम घट्ट होण्यापेक्षा त्या नात्यांमध्ये अपेक्षा या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात. आणि हर्षलचेही तसेच काहीसे होते.  मीनाक्षी मनाने आणि बोलण्याने अतिशय मनमोकळेपणाची होती. दिवसेनंदिवस त्यांचं प्रेम बहरत होत, फुलत होत, आणि मनमोकळा सुगंध देत होत. खर तर प्रेमात माणूस आंधळा होतो तसेच हे देखील आंधळेच होते.

                         एकेदिवशी सकाळी सकाळी हर्षलला मीनाक्षीचा फोन आला. आणि मीनाक्षी तेवढ्यात म्हंटली, हर्षल मी घरी एकटी आहे. येशील का घरी ? सुरवातीला हर्षलचा नकारच होता. पण तेवढ्यात थोडा विचार केला तर दोघांची एकांत भेट, प्रेमाचा आस्वाद, आणि मनमोकळ्या गप्पा असा विचार हर्षलने केला. आणि तेवढ्यात पटकन हर्षल बोलला, हो एक  तासात पोहचतो घरी आणि हर्षल ने लवकर तयारी केली, आणि मीनाक्षीच्या घरी जायला निघाला. मनात असंख्य फीलिंग्स होत्या , वेगवेगळे विचार येत होते , कधी मीनाक्षीला  भेटू नि कधी नाही अस झालं  होत.

                        काहीवेळात हर्षल मीनाक्षीच्या घरी पोहचला. आणि हर्षलने दरवाज्याची बेल वाजवली. तेवढ्यात मीनाक्षीने दरवाजा उघडला. हर्षलने मीनाक्षीच्या डोळ्यात नजरानजर देण्याऐवजी त्याची नजर आजूबाजूच्या घरांकडेच होती. मीनाक्षीच्या घरी पोहचल्यानंतर हर्षलच्या मनात प्रचंड फीलिंग्स होत्या, मनात भीती होती. तसेच दोघेजण एकांत बसलेले होते . हर्षललच्या मनात प्रेमाचा आनंद जणू समुद्रासारखा वाहत होता. आणि तेवढ्यात मीनाक्षी पटकन बोलली…….

मीनाक्षी – अरे तुला कशासाठी बोलवले, हे सांगण्याचे विसरलेच ……

हर्षल – अगं, हेच ना , आपला आनंद , आपला सहवास …….

मीनाक्षी – अरे वेढ्या , गप बस, मी तुला यासाठी बोलवले आहे , की वडिलांची बदली झाली म्हणून आपल्याला सामान शिफ्ट करायचा आहे. आणि तसे पण मी घरी एकटीच होती. म्हणून तुला कॉल केला…..                          

                         खरच आजच्या तरुण पिढीला सांगावस वाटत, काय तर तुम्ही चुकले आणि हर्षल देखील चुकला, आपण विचार चुकीचा केला ना…. म्हणजे त्या एका व्यक्तीने ती घरी एकटी आहे अस संगितले आणि आपण किती विचार केला. म्हणजे कुठलीही व्यक्ति घरी एकटी आहे म्हणून ती आपल्याशी फीलिंग्स शेयर करेलच असे  देखील नाही. आपण किती विचार केला तिचा स्पर्श, तिची एकांतात भेट, आणि अलगद प्रेमाचा आस्वाद पण प्रत्येक वेळेस अस नसते हो…. दुसर्‍या गोष्टी खूप काही असतात. पण आजची तरुण पिढी प्रेमापेक्षा सुखाला जास्त प्राधान्य देते. हे कुठेतरी बदलायला हव. पण यासाठी आपली परिस्थिति नाही तर मनस्थिती  बदलायला हवी. जे नकारात्मक विचार आपल्या सोबत येतात त्यांना बाजूला सारून सकारात्मक विचार करायला शिका.  मग बघा तुमचं नाही त्या व्यक्तीच नाही तर दोघंच आयुष्य किती सुंदर होईल.  

                                                                                                                                                                                            प्रसाद सोनवणे                     

5 thoughts on “ती एकटी असतांना”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *