आज पिवळ्या हळदीने देह माझे माखले होते तुझ्या उष्ट्या हळदीने तन माझे मोहरले होते तुझ्या नावाचा हिरवा चुडा साज शृंगार ही केले होते गाठ बांधुनी मी पदराची सप्तपदीचे फेरे घेत होते आज तुझ्या नावाचे सजना लालाटी कुंकू लावून घेते मंगळसूत्र हे सौभाग्याचे सदैव हृदयाशी मी बाळगते हात माझा देऊनी तुझीया कन्यादान आई बाप करिते तुझ्याचसाठी मी रे सख्या सर्व पाठी सोडून येते आता तुझ्याशीच माझे साता जन्माचे नाते जोडते हात तुझा घेऊनी हाती संसाराचे माप मी ओलांडते आशीर्वाद घेऊनी थोरांचा सुखी संसाराची सुरूवात करते