वृद्धाश्रम
नवसाने दिधला मुलास जन्म
कुशीत घेवून केले जागरण
स्वतः सोसूनी दुविधा साऱ्या
दिल्या मुलासी सर्व सुविधा
कधी न त्यांचे वाईट चितले
पोटच्या पोरांनी खेळ मांडले
स्वतःच्या घरात परके जाहले
तेव्हाच बाई वृद्धाश्रम निघाले
बोट धरूनी चालावया शिकविले
थकल्यास खांदी उचलून घेतले
त्यांनीच मोठेपणी बापासंगे
दोन पाऊल चालण्यास नाकारले
जन्मदात्यांचा आदर जेव्हा होतो कमी
तेव्हा धाडता मायबापासी वृद्धाश्रमी
उपसून कष्टांचा डोंगर
लेकरांसाठी केले घरदार
त्यासी शिकविल्या तोल सावरून
चालावयाच्या गोष्टी चार
पण होता मुलांमध्ये वाद
मायबापासी दुःख अपार
सुटले घर , फुटे दगडा पाझर
तेव्हा वृद्धाश्रमाचे दिसते दार
जगण मुलांच्या हसण्यावर
अन् दुःखावर तर रोज मरण
मायबापासम प्रेम करणार
जगी दुजा सापणार कोण
भुषण घराच समजून ठेवा
वडिलधाऱ्याशी हो वागण
निराधाराच जगण वाईट वागण
नकोच वृद्धाश्रम शोधण
प्रेमाची दौलत दुःखाने लुटली
मातृ कोख कलंकीत केली
मुले बिघडली तर सुखाची
पाने सर्व गळून जायची
पेरावे जे उगवते तेच
उद्या त्यां ठायी आपणच
म्हणून जन्मदात्याचे फेडावे पांग
तेव्हाच वृद्धाश्रम पडतील माग
मायबापासम सासूसासरे
त्यांच्या प्रेमाची लागुद्या आस
त्यांच्या सुसंस्काराची /, सहवासाची
असे गरज खरी नातवंडास
अपेक्षा त्यांच्या प्रेमाचे दोन शब्द
हवे दोन वेळी दोन घास
घरात नांदेल सुखशांती अन्
लागेल कुलूप वृद्धाश्रमास
– संयोगिता काशिनाथ शुक्ल