जेष्ठ अभिनेते यांचं छोट्या पडड्यावर पुनरागमन
स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे. या मालिकेत मल्हार कामत आणि स्वराजचा सांगीतिक प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेला कमी दिवसात प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. लवकरच जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची एंट्री होणार आहे. मल्हारने आपल्या गाण्याचं शिक्षण ज्यांच्याकडून घेतलं ते त्यांचे गुरु यांची व्यक्तिरेखा विक्रम गोखले साकारणार आहे. या आधी स्टार प्रवाहाची अग्निहोत्र मालिकेत विक्रम गोखले यांनी भूमिका केली होती.
एकीकडे वैदेहीच्या आठवणी तर दुसरीकडे लेकीचा शोध सुरु असताना पंडितचींच्या येण्याने मल्हारच्या आयुष्यात नेमकं कोणतं वळण येणार? विक्रम गोखले या वेळी म्हणाले की , नव्या पिठीसोबत काम करायला नेहमीच आवडेल. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अतिशर उत्सुक आहे. अशी भावना व्यक्त केली आहे.