ऋतु
तु असेच मला नेहमी टाळायचे..
किती श्रावण आम्ही खरे पाळायचे..
घेतली उशीने कुस बदलूनी
ऋतू विरहाचे,
कधी सांग बदलायचे…
श्वास कोंडला सखे तुझ्या सावलीत माझा
आणखी किती मी पुढे सरकायचे..
कोवळ्या वादळाने पेरल्या जखमा अंगभर..
आणखी कितीदा सांग वार झेलायचे…
सांभाळली सखे आयुष्याने कुरतडलेली पाने,
हृदयाला कुठवर आता जाळायचे..
सुकल्या म्हणे तांबूस डोळ्याच्या विहिरी,
आसवे तुझ्या साठी किती गाळायचे..
ओढणीतल्या बिस्किटाचा स्वाद रेंगाळतो आजही जिभेवर,
जुनेच फोटो तुझे किती चाळायचे..
माहीत नाही कोणत्या वळणावर होईल भेट पुन्हा, तुझ्या आठवणीत कसे आयुष्य काढायचे.
सूरज खंडारे