राज ठाकरेंच सह्यादी वाहिनीला पत्र…

सह्याद्री वाहिनीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रातून ईशारा दिला आहे. वाहिनीवर लागणारे कार्यक्रम हे मराठीतील कार्यक्रमाचं प्रसारण करावे. दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा मराठी या भाषेतील कार्यक्रमचं प्रसारीत करण्यात यावे. अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

पत्र देण्यावेळी पक्षाचे बाळा नांदगावकर, नितिन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी दूरदर्शनचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांची प्रसारण भवनात भेट घेऊन दिले.या पत्राद्वारे सर्वसामान्यांच्याही तक्रारी असल्याचं मनसेनं या पत्रात संगितले आहे. या मागणीचा नक्की विचार करावा अशी विनंती करताना असं झालं नाही तर मनसे हा प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ती पावलं उचलेल असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: