अभिनेता प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत
अभिनेता प्रसाद ओक नेहमीच वेगवेगळे चित्रपट, मालिका यांमुळे प्रेक्षकांसमोर येत असतो. धर्मवीर चित्रपटामुळे प्रसादच्या अभिनयाची भुरळ सर्वांनाच पडली. त्यासोबतच चंद्रमुखी चित्रपटाचे दिग्दर्शन करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
नुकतीच प्रसाद ओकने इसण्टागरांवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट सोबत एक फोटो शेअर केला आहे. आणि त्याखाली कॅप्शन दिली आहे.’पार्टी देणार’ असं लिहिलेलं टी-शर्ट परिधान केले आहे.त्याचे हे कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रसादने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “चंद्रमुखी” आणि “धर्मवीर” दोन्ही चित्रपटांवर पुरस्कारांचा पाऊस पडायला सुरुवात झालीय… So आता “ते सगळे” PARTY साठी मागे लागणारच आहेत… मी आजच देणार होतो पार्टी… पण नेमका श्रावण सुरु झाला. आता पार्टी ठरेपर्यंत हस्तलिखित कडून आलेला हा टी-शर्ट “हास्यजत्रा” टीम ला समर्पित, असे प्रसाद ओकने म्हटले आहे.
प्रसाद ओकला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात पार्टी कधी देणार असा प्रश्न कायम विचारला गेलेला असतो. कदाचित त्याच प्रश्नाचे हे उत्तर असावं..