मराठीतील जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन
मराठीतील जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदीप पटवर्धन हे गिरगाव येथे वास्तव्यास होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिका, नाटक अश्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवला आहे. त्यांचे मालिका , चित्रपट आजही तितक्याच लोकप्रिय आहेत.
अभिनेता प्रदीप पटवर्धन यांचं मोरूची मावशी हे नाटक रंगमंचावर लोकप्रिय होते. या नाटकाने त्यांना एक खास ओळख निर्माण करून दिली. त्यासोबतच नवरा माझा नवसाचा, नवरा माझा भवरा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशा अनेक चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले होते. कौटुंबिक पात्रांपासून ते खलनायकाच्या पात्रांपर्यंत त्यांची सर्वच कामे प्रेक्षकांना भारावून टाकणारी होती.