प्लेनेट मराठी प्रस्तुत 'मी पुन्हा येईन' वेबसिरीज प्रदर्शित
प्लेनेट मराठी प्रस्तुत ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. राजकारणातील परिस्थिति यावर मार्मिक पद्धतीने भाष्य करणारी या वेबसिरिजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या वेबसिरीजचे लेखन , दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केले आहे. या वेबसिरीजमध्ये सायाजी शिंदे , भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव असे दमदार कलाकार आहे.
‘मी पुन्हा येईन’या वेबसिरीजचे काही एपिसोड प्रदर्शित झाले असून येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. सत्तेसाठी पक्ष वरिष्ठांना विनवण्या, आणि सत्ता , मंत्रिपद आणि त्या सोबतच विनोद अश्या सर्व बाजूंनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्लनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात की, या वेबसिरीजची निर्मिती विनोदी शैलीत केली आहे. सध्याच्या राजकरणाशी याचा काहीही संबंध नाही. प्लनेट मराठी, गौतम कोळी, व जेम क्रिएशन्स यांनी निर्मिती केली आहे.