संपूर्ण कला क्षेत्र ज्या चित्रपट , कला क्षेत्राशी संबंधित पुरस्कराची आतुरतेने वाट बघतात, तो पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार होय. राष्ट्रीय पुरस्काराचे यंदाचे 68 व्या वर्ष होते. हा पुरस्कार सोहळा दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. कलाकारांना त्यांच्या उकृष्ट कामासाठी या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येते. शास्त्रीय गायक राहुल देशपांडेला ‘मी वसंतराव ‘ चित्रपटच्या पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या सोबतच ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट देखील उकृष्ट सिनेमा ठरला आहे. या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीवने मुख्य भूमिका साकारली आहे. पार्श्व गायनासाठी राहुल देशपांडेला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही मराठी चित्रपट सृष्टीसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
राष्ट्रीय पुसस्कारात बेस्ट ज्यूरी फीचर फिल्मसाठी सिद्धार्थ मेनन अभिनीत ‘जून’ चित्रपटाला पुरस्कार मिळाला सून या सिनेमाची निर्मिती प्लेनेट मराठीने केली आहे. नॉन फीचर्स फिल्ममध्ये ‘कुंकूमार्चन’ या मराठी चित्रपटाला पुरस्कार मिळाला. ‘अवांचित’ आणि ‘गोदाकाठ’ या दोन मराठी सिनेमांसाठी किशोर कदम यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे.
पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
राहुल देशपांडे चित्रपट – मी वसंतराव
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
गोष्ट एका पैठणीची- दिग्दर्शक- शांतनू रोडे
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट
फनरल मराठी चित्रपट- विवेक दुबे
सर्वोत्कृष्ट बालकलाकार
अनिश गोसावी- चित्रपट- टकटक
आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर – चित्रपट सुमी
विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म
जून (मराठी) – प्लॅनेट मराठी – अभिनेता- सिदार्थ मेनन
गोदाकाठ आणि अवांचित मराठी चित्रपट – अभिनेता- किशोर कदम
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट
तानाजी : द अनसंग वॉरियर- अजय देवगण – सर्वोत्कृष्ट अभिनेता