
मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या मानल्या जाणार्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज 22 जुलै रोजी करण्यात आली आहे. ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटाने बाजी मारली आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनु गणेश रोडे असून प्लनेट मराठीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात.राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोच्या अधिकृत ट्विटर पेजवरून देण्यात आली आहे.’गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल फिल्मी प्रवासाकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा …!