माता रमाई
दुबळ्या संसारात नांदली
माता रमाई भिमाची
खंत ना कसली मनी
आई ती दीन दलितांची
रमाईच्या सहवासाने
मिळाली साथ बाबांना
भाग्य लाभले आम्हांस
आई मिळाली लेकरांना
त्यागाची मूर्ती रमाई
होतीस किती बलवान
अपमान सहन करीत
राखीला बाबांचा मान
घास भरवूनी लेकरांना
स्वतः उपाशी राहिली
निमूटपणे आनंदाने
भाकरीच्या तुकड्यावर जगली
स्व: कष्टाच्या घामाने
एक-एक पैसे जोडले
बाबांना शिक्षणासाठी
तिने परदेशी पाठविले
मनाने न होता दुःखी
कुंकूतच होतं समाधान
पतीच्या सेवेसाठी झिजली
कार्य रमाईचे महान
सोन्याचा दिवस उगविला
नौकोटीची माय माऊली
आम्हा जगण्याची प्रेरणा
भीमाची खंबीर साऊली
स्मरण करुनी आज
रमाईला करितो वंदन
नशिबाने केला घात
माय माऊलीला विनम्र अभिवादन
सोनाली कोसे