अग्रलेख
काळ माझा असो वा तुझा..
खेळणे एक होते
भार माझा असो कि तुझा
हुंकार नेक होते..
आता म्हणे तु, मोठा माणूस झाला
मागे पुढे तुझ्या, चेहरे कित्येक होते
शेतकऱ्यांच्या पिलांना नसतो दिवाळी दसरा..
त्याच्या घामाच्या थेंबा वर जगले प्रत्येक् होते..
का म्हणून आले, माणसे मेणबत्या घेऊन..
ओढणी सरकली म्हणून हसले, ते हेच लोक होते..
उपाशी देवळाच्या पायरीशी, तुमचा पांडुरंग निजला
देवाशी तुमचे भांडणे, सगळे फ़ेक होते..
आता ही नवलाई इतकी म्हणून का,
त्यांची भुक पेपरतली अग्रलेख होते..
सूरज खंडारे

