झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत इंद्रा आणि दिपूचं लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दोघांचे लग्न झाल्यावर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच या दोघांच्या हळदीचे चित्रीकरणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहे. या दोघांच्या नात्यांमध्ये बर्याच दिवसांपासून दुरावा आणि वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत होत्या पण अखेर या सर्वांना आता वेगळे वळण आले आहे. दोघांचा विवाह झाल्यानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.



