मन मारून आपण जगावं

आपलच दुःख आपणच लपवाव
चेहरा कायम हसरा ठेवावं
आपल्याच माणसांशी मजेत बोलावं
हसत खेळत आपण जगावं
मन मारून आपण जगावं

संकटे कटी ही यावं
सामोर आपणच जावं
जखमा झाल्या कितीही
फुंकर मात्र आपण माराव
मन मारून आपण जगावं

मनावरच्या जखमांना झाकाव
वेदना आतून झाल्या कितीही
कुणाला मात्र दिसत नसावं
ज्याच्या वेदना त्यालाच कळाव
मन मारून आपण जगावं

डोळ्यातील आसवे लपवावं
आतून मात्र रडत जावं
वरून चेहरा हसरा ठेवावं
कायम आनंदी दाखवाव
आपणही आनंदी राहावं
मन मारून आपण जगावं                            

                                मेघा शहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: