मलाही कोणी समजून घ्या
सर्वांच्या मनाचा मीच का विचार करायचा
माझ्या मनाचा कुणीतरी विचार करून बघा
सर्वांसाठी मीच का तडजोड करायची
माझ्यासाठी कुणीतरी तडजोड करून बघा
सर्व नाती मीच का निभावून न्यायची
माझ्यासाठी कुणीतरी निभावून बघा
सर्वांसाठी माझा आनंद का पणाला लावायचा
माझ्यासाठी कुणीतरी आनंद पणाला लावून
बघा
सर्वाँना आनंदाने हक्क आहे जगायचा
या जीवाला पण मन मुराद जग,असं कोणीतरी म्हणून बघा
कुणीतरी मलाही समजून घेऊन बघा
मेघा शहा