निसर्ग कळणार नाही
मैत्री तशी आहे दोघांची
सांभाळणार कोणी नाही
ओरबडतोय नुसता निसर्गाला
हे मात्र सुधारणार नाही
तर निसर्ग कळणार नाही
सौंदर्य मात्र निसर्गाचं
कधी पहिलच नाही
निसर्गाला अनभवून
कधी घेतलाच नाही
तर निसर्ग कळणार नाही
डोंगर वस्तीत हे
कधी राहिलेच नाही
झाडे – वेलींच्या गर्दीत
कधी फिरलेच नाही
तर निसर्ग कळणार नाही
इथल्या शुध्द हवेला
अंगणी येऊ दिलं नाही
निसर्गाच्या पावसाच्या
गडद धुक्यात भिजला नाही
तर निसर्ग कळणार नाही
वडाच्या पारंब्यावर कधी
झोके घेतलाच नाही
निसर्गाच्या झर्यातून
कधी चालला नाही
तर निसर्ग कळणार नाही
निसर्गाचे सौंदर्य हे
तुम्हाला खुणावत आहे
मदतीचा हात थोडा
तुम्हाला मागत आहे
त्याशिवाय का तुम्हाला
निसर्ग कळणार आहे
एक तरी झाड लावाल
आशा ही करीत आहे
झाडे लावून झाडे जगवा
अशी विनंती करीत आहे
त्याशिवाय निसर्गा वरील
प्रेम कळणार आहे
मेघा शहा