जुळून आल्या वाटा
चुकून जुळून आल्या तुझ्या माझ्या वाटा
फुटून एक झाल्या जणू काही लाटा
शुभ्र काहीसे पानाआडून मोहरलेले पुन्हा
आयुष्याच्या सुंदर झाल्या पुसटलेल्या खुणा
दरवळते ना फुल तरीही जरी टोचला काटा
चुकून आले होते मना जोगते गाणे
श्वासा इतके सहज झाले स्वप्नी येणे जाणे
भिरभिरणारी लकेर सांगे आशय नाही खोटा
फुलवित अशा स्वप्नांचे ही इमले झाले घट्ट
विश्वासू खांद्यावर झुलले मनाजोगते हट्ट
जिथे न कोणी, कधी मोजला,किती फायदा तोटा
मेघा शाह