अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच वेगवेगळ्या विषयांमुळे चर्चेत असते. नुकताच हेमांगीचा तमाशा Live चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात बर्याच गाण्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. यात हेमांगी कवीने तमाशा live चित्रपटात 35 हून अधिक भूमिका साकारल्या आहे. या भूमिकेबद्दल हेमांगीने सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे.35 हुन अधिक भूमिका एकाच चित्रपटात साकारायला मिळणं हे एका कलाकारासाठी जितकं आव्हानात्मक तितकंच भाग्याचं! हे भाग्य मला दिलं तमाशा Live ने. मला वाटतं हा प्रकार भारतीय सिनेमा इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे (मी चूक असेन तर चूक सुधारावी ) कुठल्याही कलाकारासाठी एक biodata बनू शकेल किंवा एखाद्या कलाकाराच्या career मधल्या सगळ्या projects मधली सगळी characters मोजली तर ती ही कमी पडतील अशी वेगवेगळी characters मला या सिनेमात करायला मिळाली. ह्या सगळ्या पात्रांमध्ये फक्त दिसणं नाही तर भाषा, देहबोली, voice modulation, वयोगट, सामाजिक स्तर या सगळ्यात वेगळेपण underline केलं गेलं. आता Box office वर चित्रपट चालला नाही ( जे आहे ते fact म्हणून पचवायला काहीच हरकत नसते ) पण या इतक्या कमाल चित्रपटाचा एक महत्वाचा भाग मी झाले याचा मला कायम अभिमान राहील. असं फार कमी चित्रपटांबद्दल एक कलाकार बोलतो! असे बोलत हेमांगीने फोटो देखील शेअर केले आहे. या फोटोला प्रेक्षकांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे.




