हे धुंद चांदणे
नभी उगवला चंद्र असा
निषेचा रंग निळा जसा
झाडांची पानेही निजली
निद्रेच्या गर्तेतेत अवनी भिजली
सारा माहोल वाटे शांत
शीतल छायेत रात्रीची उजळली कांत
नयन, नायनांशी येऊन जडले
मिठीत येण्यास दिन तन भिडले
काहूर दाटून आले तिच्या मनी
जणू, धरती शहारली भेटीस गगनी
श्वासांचा अनोखा दरवळे वास
प्रणय रंगानी मोहरीला क्षण खास
गात राहावे, वाटते हे मंद गाणे
ऐ सखे, बघ क्षितिजा दाटले
हे धुंद चांदणे
हे धुंद चांदणे
संदीप काजळे