गावाकडे माझ्या
गावाकडे माझ्या,
“वहाळाला” पाणी असेल
तिथं माझी आजी,
कपडे धुतांना दिसेल.
आजोबा माझा,
शेतावर गेलेला असेल.
घोंगडीला “कुर्ल्या” बांधुन,
परततांना दिसेल.
मातीच्या माठात,
कुळीथाची पीठी.
भुर्रकून खातांना,
खालून वाजे शिट्टी.
आजीने ऐकून,
हुंकार दिला.
आजोबा माझा, मिशीत हसला.
आजीचा हुंकार नी, आजोबांची मिशी.
मीही म्हातारा झालो, तरी विसरेना कशी?
आज आली आठवण, जेव्हा करोना आला
“करोनाच्या” खेळात, आज गांव पारखा झाला.
मधुकर भिवा जाधव