फिल्मी प्रवासाचा मिडियाला दणका
सध्या सोशल मिडियावर सकाळ डिजिटल माध्यमातून ‘खान्देशी कलाकारांनी पुण्यातील १५० जनांना लुटले’ ही बातमी व्हिडीओ द्वारे प्रदर्शित करण्यात आली होती. या बातमीच्या शीर्षकवरून सर्वत्र खान्देशी कलाकार दुखावले गेले होते. यामुळे सर्व खान्देशी कलाकार संतप्त झाले होते. या संपूर्ण बातमीची दखल फिल्मी प्रवास ( Entertainment Media Platform) या माध्यमातून पाठपुरावा करून मिडियाशी संपर्क साधून सदर बातमीचे शीर्षक 24 तासाच्या आत बदलण्यात आले.
दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळ मिडियाने त्यांच्या फेसबुकद्वारे व इतर माध्यमातून बातमी प्रदर्शित करण्यात आली . या बातमीमध्ये नेमके काय आहे हे जाणून घेऊयात की हेमराज भावसार व दिपाली पवनीकर उर्फ दिपू क्वीन हे मुळचे खान्देशाचे आहेत यांनी मायक्रोफायनान्स कंपनी द्वारे कर्जाचे आमिष दाखवून पुण्यातील मुकुंद नगर परिसरातील लोकांकडून १२ लाख रुपये गंडवले व सुरतकडे पसार झालेत व पुणे पोलिसांनी त्यांचा मागोवा घेत व सापळा रचून त्या गुन्हेगारांना अटक करुन पुण्यात आणण्यात आले. हेमराज आणि दिपाली हे युट्यूबर आहेत .पण बर्याच दिवसांपासून ते पुण्यात रहात होते. या बातमीमुळे हे दोन्ही गुन्हेगार असून यांच्या नावाचा समावेश असायला हवा होता. पण तसे न करता संपूर्ण खान्देशी कलावंतांचा उल्लेख बातमीत करण्यात आला होता. यामुळे ‘खान्देशातील सर्वच कलाकार संतप्त झाले होते. त्या अनुषंगाने फिल्मी प्रवासाचे सीईओ प्रसाद सोनवणे व अस्सल खान्देशी कलाकार ग्रुप यांनी सकाळ मिडियाला बातमीचे शिर्षक मागे घेऊन त्यात योग्य तो बदल करून प्रदर्शित करण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार सदर बातमीचे शिर्षक बदल करण्यात आले आहे. ‘खांनदेशातील बंटी बबलीनं 150 जणांना लावला चुना ” असे सुधारित शिर्षक बातमीचे देण्यात आले आहे .