एकदा प्रेम करूया
प्रेमाच्या रंगात रंगून जाऊ या
चल रे सख्या एकदा प्रेम करू या
विसरून जाऊया दुनियेला
हातात हात घेऊन फिरुया
विचार ना कोणाचा करूया
चल रे सख्या एकदा प्रेम करू या
पंख लावुनी पाठीशी
आकाशी झेप घेऊ या
पक्षी सवे मुक्त फिरू या
चल रे सख्या एकदा प्रेम करू या
मत्स्य बनुनी कधी तरी
सागर तली जाऊ या
स्वच्छंद पणे पाण्यात
त्यांच्या सवे पोहुया
चल रे सख्या एकदा प्रेम करू या
रात्रीच्या चांदण्यात
मासोक्त पने न्हायु या
प्रेमाचा साक्षीदार
या चंद्राला बनवूया
चल रे सख्या एकदा प्रेम करू या
तुझ्या माझ्या प्रेमाला
एक नाव देवूया
सर्वानाच प्रेम देऊनी
प्रेमाच्या बंधनात बांधूया
चल रे सख्या एकदा प्रेम करू या
शत्रू असो की मित्र
लहान असो की थोर
प्रेमाने मन जिंकूया
प्रेमाचे बीज पेरुया
चल रे सख्या एकदा प्रेम करू या,
मेघा शहा