एकदा तरी येऊन जा
सुंदर किरणांच्या मध्ये
एखादा किरण बनून जा।
आरश्यात माझ्या दृष्टी साठी
एकदा तरी डोकावून जा।
कोलगेट शोधून ब्रश शोधतोय
पेष्ट ब्रश वर देऊन जा।
ओले तोंड पुसण्यास
जरा टॉवेल तरी ठेवून जा।
चहा पिणे सोडले कधीचे
जरा दूध तापवून जा।
तुला हवा असेलच थोडा तर
दोघांचा पटकन ठेवून जा।
नास्ता अर.. कसलं काय
वाटलं तू येशील येऊन जा।
थोडे पोहे भिजवून प्लेट मध्ये
चमचा ही ठेवून जा।
पोळ्या करताना ताव्याचे चटके
बोटाला थोडं बर्नाल लावून जा।
कंटाळाच असेल लावण्याचा तर
तेव्हढी ताव्यावरची भाजून जा।
कांदे कापताना डोळ्यांना चार धारा
त्या तुझ्या हातावर झेलीत जा।
हातावर झेलने, रुमालाने पुसणे, त्यापेक्षा
चार कांदे मिरच्या कापून जा।
जेवण झाले भांडे घराण्याचा त्रास
कुठून तरी ये पितांबर घे
आलीच आहेस थोडा वेळ बस
भांडे त्या शिल्पयात ठेऊन जा।
पुस्तक वाचतो टाईमपास करतो
शब्द नाही तर ओठ ठेवून जा।
उकडतय फार पंखा नाही
जवळ बसून प्रेमानं हवा घालून जा।
सुचत नाही काय करू
जरा तुझे शब्द सुचवून जा।
एकांती आहे कोणी नाही जवळ
सहवासी ये अन मला मोहून जा।
वादळ आले वीज चमकली
पदर उडताच थोडी लाजून जा।
“पदर सावरते, त्याला भेटते,
थांब जरा” असे वादळाला सांगून जा।
ढग गडाडले पाऊस शहराला
रोमरोम अंगात सामावून जा।
भिजू नको पाण्यात सर्दी होईल
एकच आहे छत्री, छत्रीत येऊन जा।
नदी तिरी एकटाच बसलोय
जवळ ये पाण्यात पाय टाकून जा।
पडेल मी नदीत सांभाळून
जरा किनाऱ्याशी हात धरून जा।
चित्रपट आहे हाऊसफुल
लेडीज लाईनीत नंबर लावून जा।
नंबर भेटला इकडे तिकडे
शेजारीच थोडं सरकून बसून जा।
कविता लिहितोय विनाशब्दांची
एखादा अलंकार बनून जा।
शब्द आहेत अपुरे कवितेत
एव्हडी कविता बनून जा।
निद्रेत अजूनही काटे आहेत
काटे थोडे बाजूला सारून जा।
सजविण्यास स्वप्न माझे
प्रिये स्वप्नात येऊन जा।
प्रकाश बडगुजर