स्वप्न
डोळ्यांत अवघे विश्व
सामावतात ते स्वप्न…..!!!
सुखी संसाराचा भास
दाखवतात ते स्वप्न…..!!!
ऊंच शिखरावर जाण्याची जिद्द
पुर्ण करतात ते स्वप्न…..!!!
गरुडझेप घेण्याची ईच्छा
जागवतात ते स्वप्न…..!!!
गरिबीतून श्रीमंत बनण्यास
सामोरे नेतात ते स्वप्न…..!!!
कठीण प्रसंगांना तोंड देण्यास
सांगतात ते स्वप्न…..!!!
खचून न जाता कधी,
पुढे पाऊल टाकण्यास
सांगतात ते स्वप्न…..!!!
जीवन अगदी सुखकर
बनवतात ते स्वप्न…..!!!
मोठ्या विचारातून प्रयत्न
करतात ते स्वप्न…..!!!
जीवनात स्व-बळावर यशस्वी
बनवतात ते खरे स्वप्न…..!!!
तेच खरे स्वप्न…..!!!
सोनाली कोसे