बालपण

जुन्या आठवणीत कधी
रमुन जावस वाटतं
का झालोत मोठे आज
पुन्हा बालपणात जावस वाटतं

लहान असतांना बाबाच्या
खादयावर जगाची सवारी मिळे
गोड गोळ खाऊ आणि
मोठे थोर लोकांचे बोलाचे धळे

पाऊले होती नाजूक तरी
चुकाची ना पाय वाट कधीच
आज मोठेपणाचं हरवत असे
शहाणपणा झाली अधिकच

लाडात वाढणार लेकरूच बर
आज आहे मोठेपनीं डोक्याला तान
आपल्या छोट्या चुकीमुळे
हरवत चाललंय मोठ्याचा मानसन्मान

बालपनी च्या आठवणी आज
मनी आठवते आहेत रोजच
मोठं का झालो लवकर वाटतं
मन रमत बालपनी माझंच

            रेश्मा बावणे 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: