बिग बॉस मराठी सीझन 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
कलर्स मराठी वाहिनीवर पहिले तिघही पर्वाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. सर्वेच चौथ्या पर्वाची आतुरतेने वाट बघत होते. या पर्वासाठी बिगबॉस मराठीमध्ये सुत्रसंचालन कोण करणार ? या गोष्टीची चर्चा बरेच दिवस चालली होती . पण काही दिवसांपासून बिग बॉस सीझन चौथ्याचे प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांनाच त्याची उत्तरे मिळाली. त्यामुळे आता हा चौथा सिजन कधी सूर होणार यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
बिगबॉस मराठी हा सीझन येत्या सप्टेंबर महिन्यात सुरू होत असल्याची चर्चा होत आहे. साधारण 25 सप्टेंबरला सुरू होण्याची शक्यता आहे. कारण सध्या सुरू असलेला सुर नवा ध्यास नवा हा कार्यक्र्म अंतिम टप्यात आलेला असून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रंगणार असल्याची शक्यता आहे. याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.