अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने दिली आनंदाची बातमी
मराठी चित्रपटसृष्टीतही बर्याच दिवसांपासून अनेक मराठी कलाकार लग्न करत आहे. नुकतंच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या साखरपुडयाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. भाग्यश्री मोटे हिने विजय पालांडे बरोबर साखरपुडा केला आहे. भाग्यश्रीने मराठी सोबत हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटात देखील आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
बर्याच दिवसांपासून टे रिलेशनशिपमध्ये होते. भाग्यश्री नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. फोटो शेअर केल्यानंतर तिला तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला. साखरपुडा झाल्यानंतर आता लवकरच लग्नाची देखील तारीख भाग्यश्री सांगणार आहे.