प्रेम
नाही नाही म्हणत प्रेम कधी घडत
जीवनाच्या अनामिक वाटेतूनी
जन्म ते घेत
दोन अनोळखी व्यक्तींचे
ऋणानुबंध ते जोडत
एकमेकांच्या मनात
प्रीतीचा धागा ते विणत
मनातल्या भावकळ्या
उमालयला जागा ते देत
सहिष्णुतेची दोन फुले ते गुंफत
परस्परांच्या भावना ते ओळखत
एकमेकांच्या डोळ्यात स्वप्नंमय
दुनिया ते पाहत
काहींचं प्रेम अबोल असतं
अन् सांगायचं ते राहूनच जात
मेघा शहा

![प्रेम [Prem]](https://filmypravas.com/wp-content/uploads/2022/04/Snapshot_61-1-1024x576.jpg)