वृत्त-मंजूघोषा
वृत्त-मंजूघोषा माय नारी तू जगाची द्वार आहेमानवाच्या जीवनाचे सार आहे तूच आई,तूच भगिनी,तूच कन्यावीट आम्ही तू घराचा पार आहे भार सोसत जन्म देते लेकरांनाफार मोठा हा तुझा उपकार आहे जोडते माहेर सारे सासराशीतू मनाची खूप निर्मळ धार आहे पुज्य देवी वंदितो हा ‘देवदत्ता’आमची तू आदिशक्ती नार आहे देवदत्त बोरसे